LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावमध्ये ‘क्रेडाई बेलकॉन २०२६’चा भव्य प्रारंभ*

बेळगाव शहरातील सीपीएड मैदानात उत्तर कर्नाटकातील सर्वात भव्य आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे रिअल इस्टेट प्रदर्शन ‘क्रेडाई बेलकॉन २०२६’ आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विशेष उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास आमदार आसिफ सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी तसेच क्रेडाई कर्नाटकचे अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनातून बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या गृहसंकल्पना आणि बेळगाव शहराचा वेगाने बदलणारा विकास पाहायला मिळत आहे.

यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगाव हे गुंतवणुकीसाठी वेगाने पुढे येणारे शहर असल्याचे नमूद केले. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी बेळगाव सुरक्षित, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन लाभ देणारे शहर असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटक राहुल जारकीहोळी यांनी आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की, अशा जागतिक दर्जाच्या प्रदर्शनामुळे स्थानिक नागरिकांना घर खरेदीसाठी मुंबई, पुणे किंवा बेंगळुरूसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही. बेळगावमध्ये वाढत असलेले उद्योग आणि रोजगाराच्या संधी पाहता हे प्रदर्शन अत्यंत समयोचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने बेळगावशी असलेल्या आठवणींना उजाळा देताना गेल्या काही वर्षांत शहराने घेतलेली झपाट्याने झेप उल्लेखनीय असल्याचे सांगितले. घर ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची गरज असून, बेलकॉनसारख्या प्रदर्शनामुळे एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध होतात, ही बाब कौतुकास्पद असल्याचे तिने नमूद केले.

बेलकॉनचे अध्यक्ष प्रशांत वांडकर यांनी सांगितले की, यंदाच्या प्रदर्शनात भव्य स्टॉल्ससह विविध गृहप्रकल्प, प्लॉट्स, फ्लॅट्स आणि बांधकाम साहित्याची माहिती दिली जात आहे. या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित असून ग्राहकांना तज्ज्ञ मार्गदर्शन आणि सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत आहेत.

चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट्स तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. एसबीआयसह नामांकित बँकांचा सहभाग असल्याने गृहकर्ज प्रक्रियाही अधिक सुलभ झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*