Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कित्तूर कर्नाटक सेनेच्या महिला आघाडीचा भव्य शुभारंभ*

बेळगांव: तालुक्यातील मच्छे गावात कित्तूर कर्नाटक सेनेच्या महिला आघाडीचे औपचारिक उद्घाटन रविवारी (दि. 11 जानेवारी 2026) मोठ्या उत्साहात पार पडले. मच्छे येथील भैरवनाथ नगरमधील श्री साईबाबा मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव तळवार प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना महादेव तळवार यांनी महिलांनी केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता संघटित शक्ती म्हणून पुढे येण्याची गरज व्यक्त केली. नाडू-नुडी, जमीन-पाणी यांच्या संरक्षणासाठी महिलांनी सजग व स्वाभिमानी भूमिका बजावावी, तसेच स्वावलंबी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत नाडू आणि नुडीवर संकट आले असताना, प्रसंगी जीवन पणाला लावून लढण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मत व्यक्त करत त्यांनी सर्वांनी एकजुटीने संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला राज्य शेतकरी आघाडीचे अध्यक्ष कोट्रेश पट्टणशेट्टी, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभा मळशेट्टी, जिल्हा संघटन सचिव जयश्री मिर्जी, बेलगावी तालुका अध्यक्षा विद्या कमतगी, हुक्केरी तालुका अध्यक्षा अंबिका चलवादी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी बडिगेर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कित्तूर कर्नाटक सेनेत नव्याने सहभागी झालेल्या महिलांना पारंपरिक पद्धतीने कन्नड शाल, अरिशिण-कुंकू आणि उडीतुंबवून संघटनेत प्रवेश देण्यात आला. या सांस्कृतिक आणि भावनिक सोहळ्यामुळे उद्घाटन कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*