LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सरकारचे शेतकरीविरोधी धोरण – बेळगाव भाजपकडून तीव्र इशारा*

सरकारचे शेतकरीविरोधी धोरण – बेळगाव भाजपकडून तीव्र इशारा

बेळगावात आज भाजप महानगरच्या वतीने हॉटेल सेंट्रल बुटीक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी, आमदार अभय पाटील, माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

पावसामुळे जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांची घरे कोसळली आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून पंचनामा, सर्वेक्षण वा मदत जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्हा मंत्र्यांसह सरकारचे हे निष्क्रिय धोरण सध्या टीकेचे धनी ठरत आहे.

भाजप नेत्यांनी स्पष्ट केले की, पीडित शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत न मिळाल्यास पक्ष उग्र आंदोलन उभारेल. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष गीता सुतार, मुख्य प्रवक्ते राजशेखर धोनी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*