LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*अलतगेतील रोजगार हमी कामगारांना काम द्या; ग्रामस्थांचे पीडीओंना निवेदन*

अलतगेतील रोजगार हमी कामगारांना काम द्या; ग्रामस्थांचे पीडीओंना निवेदन

बेळगाव : अलतगे गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून काम मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामगारांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी देवस्थान पंच समिती आणि ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी केली आहे.

देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे आणि गणपत सुतार यांच्या नेतृत्वाखाली कंग्राळी खुर्द येथील पीडीओ गोपाळ नाईक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अलतगे गावातील रोजगार हमी योजनेच्या कामगारांना मागील चार ते पाच महिन्यांपासून काम उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या कामगारांना तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील गटारांची स्वच्छता, पथदीपांची दुरुस्ती आणि विद्युत रोषणाईची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

रोजगार हमी योजनेच्या लीडर्स पूजा चौगुले, अनिता होनगेकर, सुमन पाटील, वंदना आलोजी, अनिता पाटील आणि सुमन दळवी यांनीही गावातील ज्येष्ठांच्या मदतीने हे निवेदन सादर केले. यावेळी महादेव पाटील, बंडू चौगुले यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत पीडीओ गोपाळ नाईक यांनी बुधवारपासून (दि. ११) गावातील गटार स्वच्छता आणि पथदीप दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येतील, तसेच गुढीपाडवा सणानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*