मजेस्टिक हॉटेलसमोर काही कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून त्यातील कचरा थेट रस्त्यावर उतरवून पुन्हा दुसऱ्या वाहनात भरला जात असल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार सुरू असताना परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.
फोर्ट रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि तुलनेने अरुंद रस्ता असल्यामुळे या प्रकारामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही काळासाठी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा पद्धतीने कचरा हाताळल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
महापालिकेने कचरा व्यवस्थापन करताना अशा प्रकारांना आळा घालून अधिक शिस्तबद्ध आणि स्वच्छ पद्धतीने कामकाज करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
Also read









