Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगांवचे फुटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना.*

बेळगांवचे फुटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना.

बेळगांव ता 8.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे उदयोन्मुख फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल मुल्ला तसेच सेंटपॉल शाळेचा फुटबॉल खेळाडू इशान देवगेकर हे खेळाडू पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

कोडगु विराजपेट येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगांव जिल्हा संघाने उपविजेतेपद पटकाविले होते. यात सरकारी शाळा विद्यानगर बंगळुर विजेता ठरला होता.

आता 12 ते 16 जानेवारी दरम्यान पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कर्नाटक राज्य फुटबॉल संघात सोफिया एन एस, जीवन एस एन, चेतना आर एन, स्वरूप सुरद, श्रेयस बिर्जे, मोहम्मद अफनान, कृतिक नायक, बी वरुण कार्तिक, समृध्द कलबुर्गी, मुकुल अँथोनी के, पुंडलिक चंद्दसार, श्रेयस कारवी, गणेश विभूती, बालाजी भावी, ध्रुव हालनावर, अब्दुल मुल्ला, जीवधन पावशे, इशान देवगेकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे तर संघाचे कोच शांती एस कुमार, सरकारी शाळा विद्यानगर बंगळुर, व्यवस्थापक संदेश बी एल, मडिकेरी, जनरल मॅनेजर डॅनी इरापा सी यू विराजपेट कोडगु हे रवाना झाले आहेत.

संत मीरा शाळेच्या अब्दुल व जीवधन पावशे या खेळाडूंना क्रिडाशिक्षक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन तर इशान देवगेकर याला अँन्थोनी डिसोजा व बाळेश यांचे मार्गदर्शन लाभत आहे संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे प्रोत्साहान तर जिल्हाशिक्षणअधिकारी लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल, पीईओ जहिदा पटेल यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*