Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण*

बेळगाव :चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बेळगावचा राजा’ नवसाला पावणाऱ्या गणरायाच्या आगमनाची तयारी मोठ्या दिमाखात सुरू** असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी नव्या रूपात साकारण्यात आलेल्या भव्य रथाचे **उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, विनायक पवार, प्रज्वल पाटील, कुशल पाटील आणि प्रीतम चौगुले प्रशांत कुडे उमेश मेणशे सत्यम नाईक निलेश गुंडकल यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पूजन करून उत्साहात अनावरण करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील आणि कुशाल रमेशराव पाटील या बंधूंनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च करून आकर्षक व भव्य रथ तयार करून दिला.त्यांच्या या योगदानाबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

रथाच्या अनावरण सोहळ्यावेळी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात तसेच मंगलमय वातावरणात रथाचे पूजन व अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास चव्हाट गल्लीतील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. बेळगावचा राजा’च्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील व कुशाल रमेशराव पाटील यांच्या या सामाजिक व धार्मिक योगदानाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांच्या बदलीला ब्रेक? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड*बेळगावात पोलिसी श्वानांचा थरार! 6 जिल्ह्यांतील 18 हून अधिक श्वानांची कौशल्याची कसोटी**बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण** विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांची उपांत्य फेरीत**विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ**बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन**खानापूरच्या ताराराणीच्या तारका हॉकीत चमकल्या**शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! फळबाग पीक विम्याची अंतिम मुदत आज; 31 ऑगस्टपर्यंत नोंदणीची संधी**नंदन मक्कल धाम आश्रमातील मुलांच्या हस्ते गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ; समर्थनगरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श**खेळ विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सांघिक भावना रुजवतो : किरण जाधव*