LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगाव ग्रामीणच्या एसआयआर प्रक्रियेत त्रुटी? भाजपची केंद्रीय चौकशीची मागणी*

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत भाजपचे बेळगाव ग्रामीणचे माजी अध्यक्ष धनंजय आर. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. या प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचा दावा करत केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली संपूर्ण मॅपिंग नव्याने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 



बुधवारी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या जाधव यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन एसआयआर प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने निवेदन स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

जाधव यांच्या म्हणण्यानुसार, विवाहित महिलांच्या नोंदणीदरम्यान त्यांची माहिती योग्य प्रकारे नोंदविण्यात आलेली नाही. विवाहानंतर सासरी राहत असलेल्या महिलांना पत्नीऐवजी मुलगी किंवा बहिण म्हणून नोंदविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या मूळ कुटुंबाची माहिती पडताळून न पाहता नोंदी करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी कौटुंबिक नातेसंबंध चुकीच्या पद्धतीने नोंदविले गेल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय अनेक बीएलओंनी प्रत्यक्ष घरभेटी न देता कार्यालयात बसून माहिती कॉपी-पेस्ट पद्धतीने भरल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मतदारांची माहिती आणि कौटुंबिक तपशीलात मोठ्या प्रमाणावर विसंगती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

एसआयआरचा उद्देश दिवंगत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नोंद अद्ययावत करणे तसेच नव्याने पात्र ठरलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे हा आहे. मात्र बेळगाव ग्रामीणमध्ये या प्रक्रियेची अंमलबजावणी अपेक्षित निकषांनुसार झालेली नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.

त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही ई-मेलद्वारे तक्रार पाठविल्याची माहिती दिली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी स्वतंत्र केंद्रीय निरीक्षक नेमून संपूर्ण मॅपिंग प्रक्रिया पुन्हा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय बेळगाव उत्तर मतदारसंघातील एका धार्मिक संस्थेतून काही व्यक्ती बीएलओंकडून ओटीपी मिळवून ॲपचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या माध्यमातून मतदार यादीतील नावे पुन्हा समाविष्ट केली जात असल्याचा दावा करत या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

जाधव यांनी सर्व पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण एसआयआर प्रक्रियेचे स्वतंत्र परीक्षण करून जिथे त्रुटी आढळतील, तेथे तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*