LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगावातील हिरेमठात आठ दिवसीय पुजारी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

डी मीडिया |
बेळगाव : दक्षिण कर्नाटकातील मंदिरांच्या धर्तीवर उत्तर कर्नाटकातील मंदिरांमध्येही स्वच्छता, शिस्तबद्ध पूजाविधी आणि उत्कृष्ट भक्तसेवा यांचा अवलंब करून धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे प्रतिपादन कुंचिटिगर संस्थान मठाचे जगद्गुरू श्री हनुमंतनाथ महास्वामीजी यांनी केले.
कर्नाटक देवालय संवर्धन समिती आणि श्री गुरुशांतेश्वर जनकल्याण प्रतिष्ठान, हिरेमठ-हुक्केरी यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील लक्ष्मी टेकडी येथील श्री हिरेमठात 21 ते 28 जुलैदरम्यान आयोजित आठ दिवसीय पुजारी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिरे ही समाजातील श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ करणारी केंद्रे आहेत. मूर्तीपूजेच्या माध्यमातून सामान्य भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा मिळते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनात स्वच्छता, पूजाविधीतील शिस्त आणि भाविकांसाठी दर्जेदार सेवा यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. या उद्देशानेच पुजारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.news_1784818783_1_535.webp


याच कार्यक्रमात 'पूजा पद्धती कैपिडी' या पूजाविधी मार्गदर्शक पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला कारंजी मठाचे परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी दिव्य सान्निध्य लाभले. त्यांनी पुजाऱ्यांनी पूजाविधी, वेशभूषा आणि मंत्रोच्चार यामध्ये शुद्धता व स्पष्टता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मंत्रोच्चारातील त्रुटी टाळण्यासाठी सातत्याने अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते श्री मनोहर मठजी यांनी पुजारी हा देव आणि भक्त यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, प्रामाणिकपणा, सात्विकता आणि आदर्श आचरणातून सेवा केल्यास मंदिर, समाज आणि श्रद्धा यांचा अधिक विकास होतो, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भूषविले. बेळगाव जिल्ह्यातील विविध समाजांतील पुजाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून प्रशिक्षण देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संघचालक बाळण्णा कग्गणगी यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक पी. एस. हिरेमठ, डॉ. एम. बी. बेल्लद, डॉ. केदारेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी हिरेमठ गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी गंगाआरती सादर करून कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*