LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगावात रेशन वितरणावर सर्व्हरचा परिणाम; दुकानदार आक्रमक

बेळगाव : राज्यातील रेशन वितरण व्यवस्थेमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे रेशन दुकानदार आणि नागरिक दोघेही हैराण झाले असून, या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारी रेशन दुकानमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
मे आणि जून महिन्याचा तांदूळ केंद्र सरकारकडून एकत्रितपणे वितरित करण्यात येत असल्याने रेशन कार्डधारकांना दोन वेळा बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत आहे. मात्र, तांत्रिक अडचणी आणि सतत सर्व्हर डाऊन राहत असल्याने वितरण प्रक्रियेला मोठा फटका बसत असल्याची माहिती दुकानदारांनी प्रशासनाला दिली.
रेशन दुकानांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून त्याचा रोष दुकानदारांना सहन करावा लागत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
तसेच, सर्व्हरची समस्या तातडीने सोडवून रेशन वितरण सुरळीत करावे, बायोमेट्रिक प्रक्रियेत सुधारणा करावी आणि दुकानदारांसह ग्राहकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*