Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ.शिवाजीदादा कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा*

*मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ.शिवाजीदादा कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा*
कौतुक सोहळा व बाल एकांकिका सादरीकरण
दिनांक 30 डिसेंबर2025 रोजी ज्येष्ठ पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते डॉ.शिवाजीदादा कागणीकर यांचा सन्मान सोहळा ,शाळेतील पहिली ते दहावी गुणवंत विद्यार्थी आणि दहावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी माजी विद्यार्थी आणि सी.ए.झालेले शाळेचे विद्यार्थी कौतुक सोहळा तसेच शिवाजी दादांच्या जीवनावर आधारित 'परिवर्तनाचा वाटसरू' नाटिका सादरीकरण कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर सत्कार मूर्ती डॉ.शिवाजीदादा कागणीकर, द.म.शि.मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील,शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मा.सुभाष ओऊळकर, खजिनदार एन बी खांडेकर, शाळेचे उपाध्यक्ष प्रा सुरेश पाटील, सदस्य डॉ.पी.डी.काळे, किरण पाटील, आनंद पाटील,

सीए पांडुरंग नरेवाडकर, सीए पंकज मारीहाळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे व शिक्षक समन्वयक सविता पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले. यामध्ये सामाजिक शाश्वत मूल्ये जपण्यासाठी शाळा प्रयोगशील असते.विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या भेटी यामध्ये यंदा शरद बाविस्कर ,हेरंब कुलकर्णी , प्रा.जयसिंगराव पवार,प्रा मंजुश्री पवार डॉ. शिवाजी कागणीकर यांना आमंत्रित करण्यात आले असे मनोगत नीला आपटे यांनी व्यक्त केले.डॉ. निलेश मालगार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे वडील अशोक मालगार यांनी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी बक्षिसे दिली. अशोक मालगार यांचे स्वागत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा मान्यवरांच्या हस्ते, शाळेतील सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी सीए पंकज मारीहाळ व सीए पांडुरंग नरेवाडकर यांचा सत्कार मा.सी.ए.आर.एन.हरगुडे सर यांच्या हस्ते करण्यात आला.गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गजानन सावंत यांनी केले. डॉ. शिवाजी दादा कागणीकर यांना उपस्थित मुलांनी टाळ्यांच्या गजरात सन्मानाने व्यासपीठावर आणून पहिल्यांदा त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरातिथ्य केले. शिक्षक समन्वय सविता पवार यांनी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शिवाजीदादांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे पदाधिकारी यांनी शिवाजीदादा कागणीकर यांचा शाल ,भेटवस्तू , देऊन आणि मा.सुभाष ओऊळकर सरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुभाष ओऊळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार शाळेतील संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शैला पाटील यांनी केले. नाट्य लेखन शिक्षण संयोजिका नीला आपटे, नाट्यदिग्दर्शन प्रसाद सावंत, नेपथ्य लता नगरे, संगीत सहदेव कांबळे यांनी उत्कृष्टरित्या करून विद्यार्थ्यांनी परिवर्तनाचा वाटसरू ही एकांकिका सादर केली.

असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील,शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षक, विद्यार्थी ,एन,सी,सी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*