कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर आणि उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर मॅडम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रदिप पाटील सर म्हणाले की,
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन डेडिकेशन (निष्ठा), डिव्होशन (भक्ती) आणि डेटरमिनेशन (दृढनिश्चय) या त्रिसूत्रीवर व्यतीत केले. त्यांचे हे गुण आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत, तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो."
शाळेतील शिक्षिका श्रीमती किरण चलवेटकर यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या महान कार्याचा आढावा घेतला. त्यांनी बाबासाहेबांचे शिक्षण, संघर्ष आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली
Also read









