LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*दिवाळी जवळ, पण पगार दूर*

बेळगाव, ता. १८ :
शहराला २४x७ पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा वेतनप्रश्नी दमछाक सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्याचे वेतन अजूनही मिळालेले नाही, आणि दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे “दिवाळीपूर्वी पगार तरी मिळणार का?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

एल अँड टी कंपनीकडे या पाणीपुरवठा योजनेचा ठेका असून, त्याच कंपनीकडे हे कर्मचारी काम करतात. दिवाळीपूर्वी वेतनाबरोबरच बोनस मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. एल अँड टीच्या नियमित कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो, मग कंत्राटी कामगारांनाही तो मिळायला हवा, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.

यापूर्वीही पगार वेळेवर न मिळाल्याने अनेक सण नुखत्याच वेतनाविना गेले. जुलै महिन्याचे वेतन ऑगस्टच्या अखेरीस, तर ऑगस्टचे वेतन सप्टेंबरच्या शेवटी मिळाले. परिणामी गणेशोत्सव व नवरात्रीचे दिवस आर्थिक अडचणीत गेले. आता दिवाळीत पुन्हा तशीच वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जुलै २०२१ मध्ये महापालिकेकडून शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे देण्यात आली. त्यानंतरच कंत्राटी कर्मचारी या कंपनीकडे वर्ग झाले. मात्र, कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे सूर सुरुवातीपासूनच जुळलेले नाहीत. पूर्वी हे कर्मचारी महापालिकेच्या आणि नंतर नगर पाणीपुरवठा मंडळाच्या सेवेत कार्यरत होते. अनेक वर्षे सेवा करूनही त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही, आणि आजही ते अल्प वेतनावर काम करत आहेत.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही सणासुदीच्या काळात पगार विलंबाने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. “कंपनीने वेळेत पगार आणि बोनस दिल्यासच दिवाळीचा आनंद खरा ठरेल,” असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*