बेळगाव : शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीजपुरवठा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल इंडिया स्मार्ट मीटर प्रकल्पाअंतर्गत पहिल्या स्मार्ट डिजिटल मीटरचे उद्घाटन करण्यात आले. समाजसेवक प्रवीण पाटील यांच्या हस्ते पूजन करून या उपक्रमाला प्रारंभ झाला.
हेस्कॉमच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत येत्या काळात संपूर्ण बेळगाव शहराला स्मार्ट डिजिटल मीटर बसविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मीटरमुळे वीज वापराचे अचूक रेकॉर्ड ठेवता येणार असून ग्राहकांना बिलिंग प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता मिळणार आहे.
या कार्यक्रमाला बेळगाव नॉर्थचे AEE (CSD-3) अधिकारी अश्विन शिंदे, AEE (MRT) मुल्ला, विधायक कोरे, शितल सनदी, धर्मेंद्र हडीगुंड यांच्यासह JE लक्ष्मी, कल्लप्पा, राजू, फारूक, बिल्डर राहुल तलवारकर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सुनील व देखभाल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Also read









