रात्री सुमारे एक वाजता भगवान शंकरांना लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी वेदघोष आणि मंत्रोच्चारांच्या निनादात वातावरण अधिकच पवित्र झाले. त्यानंतर अहोरात्र जागर ठेवून केदार कवच पठण आणि नामस्मरण करण्यात आले.
पहाटे चार वाजता पारंपरिक काकड आरती संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरात्रीनिमित्त मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी आयोजित करण्यात आले होते.
या सर्व विधींचे पौरोहित्य रघु जोशी यांनी केले. विशेष म्हणजे, भगवान शंकरांना 151 लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर भावपूर्ण आरती पार पडली.
दुपारी बारा वाजता देवाला खिचडी आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
महाशिवरात्रीच्या या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
Also read









