LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*स्थानिक क्रीडापटूंना सक्षम व्यासपीठ देण्यासाठी वाल्मीकी क्रीडांगणाचा विकास*

गोकाक | प्रतिनिधी
स्थानिक क्रीडापटूंना आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करता यावे, यासाठी गोकाक येथील वाल्मीकी क्रीडांगणात आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत त्याचा विकास करण्यात आला असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
गोकाक शहरातील वाल्मीकी क्रीडांगणात के.बी. ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २०२५-२६ च्या श्री. लक्ष्मणराव आर. जारकीहोळी मेमोरियल स्मारक क्रिकेट ट्रॉफीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सतीश जारकीहोळी म्हणाले की, प्रत्येक स्थानिक क्रीडापटूला बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांत जाऊन खेळणे शक्य होत नाही. त्यामुळे शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा तालुका स्तरावरच कमी खर्चात मिळाव्यात, या उद्देशाने वाल्मीकी क्रीडांगणात प्रकाशव्यवस्था (लाईटिंग सिस्टीम) उभारण्यात आली आहे. याशिवाय बेळगाव येथे सुमारे ५० कोटी रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक क्रीडांगणाचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पूर्वी गोकाकमध्ये प्रामुख्याने क्रिकेटलाच प्राधान्य दिले जात होते. मात्र आता काळ बदलत असून, सर्व प्रकारच्या खेळांना समान संधी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे धारवाड विभागीय संयोजक वीरन्ना सवडी, बीडीसीसी बँक प्रतिनिधी, केपीसीसी युवा आघाडीचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी, आदित्य जारकीहोळी, किशोर शेट्टी, बसवराज कल्याण शेट्टी, हिरगौडा नाईकर, शिवानंद गुंजाळ, अनिल भवानी, शिशिर भवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्रिकेट ट्रॉफीच्या उद्घाटनावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः फलंदाजी केली, तर त्यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी गोलंदाजी करत उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*