Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*SIR मोहिमेत मराठी फॉर्मची मागणी; किरण जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*


भारत निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी भाषिक मतदारांना अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी सोमवारी (6 जुलै) जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात, SIR मोहिमेसाठी वापरले जाणारे अर्ज कन्नड भाषेसोबतच मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः कन्नड फॉर्मच्या मागील बाजूस मराठी भाषेतील मजकूर छापण्यात आल्यास मराठी भाषिक मतदारांना अर्ज समजून घेणे आणि भरणे अधिक सोपे होईल, असे जाधव यांनी नमूद केले.

किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, बेळगाव हा सीमाभाग असून येथे मराठी आणि कन्नड भाषिक नागरिक अनेक वर्षांपासून सलोख्याने वास्तव्यास आहेत. जिल्ह्यातील अनेक मतदारांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असल्याने केवळ कन्नड भाषेतील अर्ज समजण्यात काही नागरिकांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध झाल्यास मतदारांसह बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांनाही अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही मागणी ऐकून संबंधित विषय भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. तसेच मराठी भाषिक मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने या मागणीचा विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, किरण जाधव यांनी SIR मोहिमेचे स्वागत करत, मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी आणि दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषिक मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाने सकारात्मकपणे विचारात घ्यावी, अशी अपेक्षा सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*