LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*एलपीजी व वाणिज्यिक गॅस दरवाढीविरोधात बेळगावात काँग्रेसचे आंदोलन*

बेळगाव : केंद्र सरकारने घरगुती तसेच वाणिज्यिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ बेळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बेळगाव येथील काँग्रेस भवनासमोर पार पडले.

काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रदीप एम., जी. राजा सलीम, मनसूरअली अत्तार, ललिता माने, रोहिणी, जयश्री माळीगे, कस्तुरी यांसह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरवाढीमुळे सामान्य नागरिक, गृहिणी आणि व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्र सरकारने तातडीने गॅस दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*