LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात*

 

बेळगावात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात; दरवर्षी उत्सव साजरा करण्याचा निर्णय
बेळगाव : प्रतिनिधी
सांबरा येथील शिवमुद्रा युवा मंचाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. बेळगावातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी आणि इतिहासाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्धार मंचाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात माजी आमदार संजय पाटील तसेच भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी “धर्मवीर संभाजी महाराज अमर रहें” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी भाजपा ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम सोनाजी, शिवमुद्रा युवा मंचाचे कार्यकर्ते सुधीर हिरोजी, सोमनाथ सावंगावकर, मोहन जोई, ज्योतिबा हरजी, सोमनाथ अकनोजी, सचिन सोनाजी, प्रांजल जत्राटी, राधिका गिरमल, मिथाली जाधव, निधी हिरोजी यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्पही करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*