LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश*

गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून चन्नेवाडी ता.खानापूरच्या रहिवाश्यांना मतदानासाठी भुत्तेवाडी येथील बुथवर मतदानासाठी जावे लागत होते, त्यामुळे मतदारांची गैरसोय होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन देऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डची मागणी केली होती.

त्याच बरोबर चन्नेवाडी गावचे रहिवाशी व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व  सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनीही या मागणीचा पाठपुरावा म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी श्री.मोहम्मद रोशन यांच्याकडेही उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले होते.

त्यावेळी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात स्वतंत्र बूथ करून देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाची पूर्तता करताना जिल्हाधिकाऱ्यांनी चन्नेवाडी गावासाठी 196A हा स्वतंत्र बूथ मंजूर केला असून यापुढील मतदानासाठी गावकऱ्यांना गावच्या प्राथमिक शाळेतच मतदानाची सोय केली आहे.

या मागणीच्या पुर्ततेनंतर गावकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन,खानापूर तालुक्याचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण व तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*