Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान*

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना कायदा आणि सुव्यवस्था  विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या तक्रार अर्जानुसार  कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

शुभम शेळके यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये  पाच लाख रुपयांचा बॉण्ड व तितक्याच रकमेचे दोन जामीनदार घेऊन पोलीस उपायुक्त यांच्या न्यायालयात उपस्थित राहावे असे कळविण्यात आले होते. 

शेळके यांच्या वतीने गुरुवार दिनांक 18 जून रोजी महेश बिर्जे हे उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे मध्यवर्ती महेशच्या 22 जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या प्रचारात शुभम शेळके सक्रिय झाल्याने पोलीस प्रशासनाने सदर नोटीस बजावण्याची चर्चा आहे, यापूर्वी देखील शुभम शेळके यांना तडीपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी देखील न्यायालयात आव्हान देण्यात आले होते सदर नोटीशीला आज शुक्रवार दिनांक 19 जून रोजी वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

यावेळी वकील महेश बिर्जे व  शुभम शेळके यांच्यासह कार्याध्यक्ष धनंजय पाटील वकील बाळासाहेब कागलकर वकील वैभव कुट्रे उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान**चिकोडीच्या गुरुवार पेठेत भीषण आग; जयश्री गार्मेंट्स दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान**बेळगावात CCB पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या अफू तस्करीचा पर्दाफाश, एकाला अटक**राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबचा दबदबा; १४ खेळाडूंची ३६ पदकांची विक्रमी कामगिरी**कृष्णा नदीतून 2 टीएमसी पाण्यासाठी महाराष्ट्राकडे धाव*बेळगावात RE-NEET UG परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था;*मन्नूरमधील जमीन प्रकरणावरून ग्रामस्थांचा विरोध; प्रशासनाकडे दिले निवेदन**बेळगावात माजी सैनिकांसाठी DSC भरती मेळावा यशस्वी; देशसेवेची पुन्हा संधी**कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन**वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांवर तरुणांचा हल्ला*