*मराठी विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विभागातर्फे स्वातंत्र्याचा जागर उत्सव साजरा*
बेळगाव
शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेतील खेळगट, अंकुर, शिशु व इयत्ता १ ली विभागातील मुलांनी स्वातंत्र्याचा जागर उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला.यावेळी पूर्वप्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाच्या नकाशाची ओळख करून घेतली, तसेच स्वतः रेखाटलेल्या राष्ट्रीय प्रतिकांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते गायली. खेळगटातील विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर उत्तम कवायत प्रकार सादर केले. आपल्या चिमुकल्या भाषणांतून मुलांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'स्वातंत्र्यवीरांचा विजय असो' अशा घोषणा देत मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत नटलेली मुले सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना तीन रंगी खाऊ (गाजर , काकडी, स्वीट कॉर्न)देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभागातील शिक्षक, इयत्ता पहिलीचे शिक्षक , पालक वर्ग,कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
