LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*नयी दिशा फाउंडेशनतर्फे २५० विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*

नयी दिशा फाउंडेशनतर्फे २५० विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम; उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा
बेळगावी | प्रतिनिधी
शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी, या उद्देशाने नयी दिशा फाउंडेशनतर्फे ११ जानेवारी २०२६ रोजी भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या श्री. विनायकुमार बागली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस बाळगा, स्वतःच्या आवडी व क्षमतांची ओळख करून घ्या आणि ठरवलेल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करा, असा सल्ला दिला. योग्य करिअर निवडीसाठी आत्मपरीक्षण, शिस्तबद्ध अभ्यास, परिश्रम आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला सौ. लीलावती एच. (डीडीपीआय), श्री. वाय. जे. भजंत्री (बीईओ), श्री. आय. डी. हिरेमठ (बीआरसी), बेळगावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नयी दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शोभा डोड्डणवर व सचिव सौ. अंकिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका जे. यांनी प्रभावीपणे पार पाडले. नयी दिशा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित होते.
हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या भविष्यासंदर्भात आत्मविश्वास वाढवणारा आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे मत उपस्थित शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*