Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत अभंग गायन स्पर्धा उत्साहात*

 कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 
            वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि संतांचे संस्कार रुजवणे, गायन कलेला प्रोत्साहन देणे,मराठी भाषा व साहित्याची गोडी निर्माण करणे,आत्मविश्वास वाढवणे तसेच आपला सांस्कृतिक वारसा जपणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

          या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे 40 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई,एकनाथ अशा विविध संतांचे अभंग विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सादर केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी "माऊली माऊली" या गीतावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला. 
                एकादशीनिमित्त काही विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशात उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तीमय आणि आनंदी झाले होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिक्षक तुषार कांबळे व नीता गुंजीकर यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांची वेशभूषा मनीषा वड्डगोळ व रेणुका बागडी यांनी केली तर  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी कुरणे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
              हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. बी. एस. बिर्जे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उदय पाटील व राहुल कांबळे, श्रीकांत काटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव मॉन्सून अल्ट्रा 2026 मध्ये निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांची उल्लेखनीय कामगिरी**बेळगाव महापालिकेतील ठरावावरून पुन्हा राजकीय वातावरण तापले**यश संजय मोरे यांनी मिळविली बी.टेक. पदवी; सेमीकंडक्टर क्षेत्रात यशाची भरारी**बेळगावच्या विकासकामांना गती; मंत्री यतींद्र सिद्दरामय्या यांच्या उपस्थितीत आढावा बैठक**बागलकोटमध्ये धक्कादायक घटना; पत्नीचा जीव धोक्यात असताना पतीने केला व्हिडिओ? **शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून बेळगावात राजकीय वातावरण तापले**बेळगावच्या प्रितम रेणकेची सुवर्ण कामगिरी; KVS राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड**"सिद्धरामय्या राजकारणातून निवृत्त होत नाहीत; काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय राहतील" – मंत्री यतींद्र सिद्धरामय्या**कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत अभंग गायन स्पर्धा उत्साहात**शिक्षकांचा नेता म्हणून दत्तात्रय सावंत यांची लोकप्रियता : सीमाकवी रवींद्र पाटील आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सदिच्छा भेट; कुद्रेमानी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार*