LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*म.ए.युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन*

*म.ए.युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन*

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६ साठी आवाहन करीत आहोत. बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श शाळा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड झालेल्या पाच शाळांना मानपत्र, मानचिन्ह, शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल.

 

*पुरस्कारासाठी निकष आणि नियम खालील प्रमाणे असतील*

★ यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण तालुका आणि खानापूर तालुक्यातील सर्व मराठी प्राथमिक शाळा अर्ज करू शकतात.

 

★विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न.

 

★गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि वेगळेपण जपण्यासाठी केलेले कार्य.

 

★शाळा इमारत, बैठक व्यवस्था, मैदान इतर सोईसुविधा यांच्या सुधारणेसाठी राबविलेले विविध उपक्रम

 

★शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध सामाजिक, पर्यावरण पूरक, आरोग्य विषयक उपक्रम याची माहिती.

 

★मराठी भाषा, संस्कृती, परंपरा तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम

 

★विद्यार्थ्यांच्यामधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य तसेच विद्यार्थ्यांचा विविध क्रीडा, साहित्य, स्पर्धा परीक्षेमधील सहभाग.

 

यानुसार पुरस्कारासाठी शाळा मुख्याध्यापक/ शाळा सुधारणा समिती यांनी ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लेखीअर्ज करावेत. (शाळेच्या उपक्रमाची माहिती पी.डी.एफ मध्ये सुद्धा पाठवता येईल) असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात येत आहेत.

 

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय,*

कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव येथे अर्ज स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी

अंकुश केसरकर (अध्यक्ष) 97399 63229

श्रीकांत कदम(सरचिटणीस) 96117 56529

यांच्याशी संपर्क साधावा.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*