Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात ‘सेल्फी प्रकरणा’नंतर माळमारुती पोलीस निरीक्षकाची बदली; बी. आर. गडेकर यांची नियुक्ती*

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यासोबत घेतलेल्या सेल्फीमुळे निर्माण झालेल्या वादाचा फटका अखेर पोलीस निरीक्षकाला बसला आहे. माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बी. आर. गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही कारवाई १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादग्रस्त घटनेनंतर करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कन्नड संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

या घटनेनंतर विविध कन्नड संघटनांनी कालीमिर्ची यांच्या विरोधात निदर्शने करून कारवाईची मागणी केली होती. अखेर पोलीस विभागाने बदलीचे आदेश जारी केले असून, ही बदली ‘सेल्फी प्रकरणाशी संबंधित कारवाई’ असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात जोरात सुरू आहे.

दरम्यान, नवीन निरीक्षक म्हणून बी. आर. गडेकर यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी “शिस्त आणि समन्वय राखणे हीच प्राथमिकता असेल,” असे सांगितले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*