Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*BIMS रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी 3.7 किलो वजनाचा प्रचंड फायब्रॉईड गर्भाशय काढण्यात यश*

बेळगांव : 22 नोव्हेंबर
बेळगांव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (BIMS) रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाने पुन्हा एकदा उत्कृष्ट वैद्यकीय कामगिरीची नोंद केली आहे. दीर्घकाळापासून तीव्र वेदना आणि अनियमित रक्तस्रावांनी त्रस्त असलेल्या 42 वर्षीय महिलेला झालेला विक्रमी आकाराचा फायब्रॉईड गर्भाशय अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या काढण्यात आला.

रुग्णाच्या गर्भाशयाचा आकार तब्बल 32 आठवड्यांच्या गर्भधारणेइतका वाढला होता. सततचा जास्त प्रमाणातील रक्तस्राव आणि तीव्र पोटदुखीमुळे रुग्णाला रक्तक्षयाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. तपासणीत गर्भाशय अत्यंत जाड आणि प्रचंड आकाराचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

गायनकोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने कौशल्यपूर्ण पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पाडत 3.7 किलो वजनाचा फायब्रॉईड गर्भाशय काढण्यात यश मिळवले. रुग्ण सध्या सुरक्षित असून आरोग्य सुधारत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये डॉ. वसंत काब्बूर, डॉ. लक्ष्मी के.एस., डॉ. निखिल वर्नेक्कर आणि डॉ. गाउसिया गोरीखान यांचा सक्रिय सहभाग होता.
अ‍ॅनेस्थेशिया विभागातून डॉ. साजिद हुसेन नदाफ, डॉ. पूर्णिमा, डॉ. अद्रुष्टा आणि डॉ. रेनीटा डी'कोस्टा यांनी काम पाहिले. तसेच नर्सिंग ऑफिसर मल्लव्वा कादेशनावर आणि कर्मचारीवर्गाने शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

रुग्णालयामध्ये अशा आधुनिक आणि उच्चस्तरीय शस्त्रक्रिया सातत्याने पार पडत असल्यामुळे बेलगावातील नागरिक आता खासगी रुग्णालयांच्या तुलनेत BIMS सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वाढत्या विश्वासाने उपचारासाठी धाव घेत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

या कामगिरीबद्दल BIMS संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एरन्ना पल्लेड आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर डॉ. सरोजा तिगडी यांनी संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*