LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*कर्नाटकात मोठी राजकीय उलथापालथ? सिद्धरामय्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग*


बेंगळुरू : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या  यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत निवासस्थानी मंत्रीमंडळासाठी विशेष उपहार बैठक आयोजित केली असून या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार  हे दिल्ली दौरा आटोपून गुरुवारी पहाटे बंगळुरूत दाखल होणार असून विमानतळावरून थेट मुख्यमंत्री निवासस्थानी जाणार असल्याची माहिती त्यांच्या अधिकृत दौरा पत्रकातून समोर आली आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपालांची भेट घेऊन पुढील राजकीय निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेस विधायक दलाची बैठक घेण्यात येऊ शकते. या बैठकीत नवीन विधायक दल नेत्याची निवड होण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या वर्षभरापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू होते. आता अचानक वाढलेल्या बैठका, दिल्लीतील हालचाली आणि वरिष्ठ नेत्यांचे दौरे यामुळे राज्यात मोठ्या राजकीय बदलाचे संकेत स्पष्ट होत असल्याचे मानले जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*