LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावचे जलतरण प्रशिक्षक उमेश कलघाटगी यांना कर्नाटक सरकारचा ‘जीवनगौरव पुरस्कार’*

बेळगाव :क्रीडा क्षेत्रातील दीर्घ, समर्पित आणि प्रभावी योगदानाची दखल घेत कर्नाटक सरकारतर्फे बेळगावचे प्रख्यात स्विमिंग प्रशिक्षक उमेश जी. कलघाटगी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बेंगळुरू येथे झालेल्या भव्य समारंभात मुख्यमंत्री श्री. सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

मागील २४ वर्षांपासून श्री. कलघाटगी यांनी केवळ प्रशिक्षक म्हणून नाही, तर समाजातील वंचित आणि दिव्यांग मुलांसाठी मार्गदर्शक, आधार आणि प्रेरणास्त्रोत म्हणून काम केले आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लबच्या माध्यमातून त्यांनी शारीरिकदृष्ट्या अपंग, बौद्धिकदृष्ट्या अपंग, दृष्टिहीन, श्रवणहीन तसेच अनाथ मुलांना पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण, वाहतूक, क्रीडा साहित्य आणि आहार उपलब्ध करून दिला.

त्यांच्या प्रशिक्षणातून ९ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, तसेच शेकडो राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत. या खेळाडूंनी मिळून ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके आणि हजारो राष्ट्रीय-राज्य पदके पटकावली आहेत. प्रशिक्षक कलघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले काही मानकरी म्हणजे – राष्ट्रपती पुरस्कार विजेते, चार एकलव्य पुरस्कार विजेते, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार विजेते, तसेच ऑंड्रू स्कॉट पुरस्कार प्राप्त युवा जलतरणपटू, ज्याने लंडनमध्ये सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनेल पोहून दाखवला.

खेळाडू घडवण्याबरोबरच अनेकांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात स्थिर रोजगार मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. स्वतःही आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा वेळा भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा गौरव त्यांनी वाढवला आहे.

श्री. कलघाटगी यांच्या अतुलनीय सेवेला डॉ. प्रभाकर कोरे, श्री. जयंत हुंबरवाडी, निवृत्त अविनाश पोतदार, श्री. गोपाल होसूर, श्री. दिलीप चिटणीस, श्री. शिरीष गोगटे, एसएलके ग्रुप, मानेक कपाडिया, लता कित्तूर, डॉ. नितीन खोत आणि अनेक मान्यवरांनी अभिनंदनपर संदेश पाठवले आहेत.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले,“बेळगावच्या जनतेने दिलेला पाठिंबा हे माझे बळ आहे. पुढेही समाजातील प्रत्येक मुलाला क्रीडेद्वारे सक्षम करण्याचे कार्य सुरूच राहील.”

उमेश कलघाटगी यांचा प्रवास हे सेवाभाव, चिकाटी आणि मानवी संवेदनेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*