या बैठकीत नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होऊ नये, तसेच इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व पेट्रोल पंपांवर “पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध आहे” असे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून नागरिकांनी घाईघाईने इंधन खरेदी करण्याचे टाळावे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच पंप परिसरात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यासाठी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जवळील पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील पेट्रोल पंपांवर २४ तास पोलीस गस्त ठेवण्यात येणार असून, पंप चालक आणि कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
Also read









