बेळगाव डी मीडिया | बेळगाव
बेळगाव न्यायालयात नव्याने नियुक्त झालेल्या न्यायाधीशांच्या स्वागतासाठी बेळगाव बार असोसिएशनतर्फे विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, २९ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता बेळगाव येथील जुना बार असोसिएशन हॉल (टी. व्ही. हॉल) येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात बेळगाव न्यायालयात नव्याने रुजू झालेले मा. श्री. दिलीप डी. (सहावे JMFC, बेळगाव) आणि मा. श्री. सुमंत मंजुनाथ नाईक (आठवे JMFC, बेळगाव) यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सर्व वकील सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बार असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. सचिन आर. शिवण्णावर यांनी केले आहे.
