Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बागलकोट दगडफेक प्रकरण : मिरवणुकीवरील हल्ल्यानंतर कठोर कारवाईची मागणी*

बागलकोट दगडफेक प्रकरण : मिरवणुकीवरील हल्ल्यानंतर कठोर कारवाईची मागणी

बेळगाव | प्रतिनिधी

बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणावरून वातावरण तापले असून, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री राम सेना बेळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जयंती उत्सव शांततेत सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, शिवजयंतीच्या पावन सोहळ्याला गालबोट लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

https://youtube.com/shorts/6kvVezzZ09g?si=4HaSxXwq1fDzuto9

या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत असली तरी, उर्वरित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्या मागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करून त्यांना जिल्हाबंदी करण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

उत्तर कर्नाटक प्रदेशाध्यक्ष श्री रविकुमार कोकित्तकर यांच्या नेतृत्वाखाली  निवेदन सादर करण्यात आले.

प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*