Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“कंग्राळी खुर्दमध्ये काळा दिन निषेध फेरीसाठी जनजागृती”*

कंग्राळी खुर्द (बेळगाव) :
एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळा दिनाच्या निषेध फेरीत कंग्राळी खुर्द गावातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री गावभर घोषणाबाजी करत जागृती मोहीम राबविण्यात आली.

“हा लढा न्यायासाठी असून आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी आहे,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. संविधानाने दिलेल्या हक्कांनुसार मराठी भाषिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियोजनानुसार शांततेत निषेध फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

जागृती फेरीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी झाला. यावेळी जि.प. सदस्या सरस्वती पाटील आणि माजी अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितले की,
“सीमाप्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि सत्य आपल्या बाजूने आहे. न्यायदेवता आपल्याला नक्कीच न्याय देईल, पण आपली ताकद आणि एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी सकाळी आठ वाजता शांततेत फेरीत सहभागी व्हावे.”

या वेळी म.ए. समितीचे तालुका चिटणीस अॅड. एम.जी. पाटील, बीडी मोहनगेकर, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, रूक्मिणी निलजकर, प्रेमा जाधव, रेखा पावशे, प्रेमा पाटील, वाय.आर. पाटील, बी.एन. पूजारी, के.एम. जाधव, के.बी. पाटील, बी.के. बाळेकुंद्री, शाहीर बाबुराव पाटील, बाळू पाटील, प्रकाश पाटील, दिनेश मुतगेकर व निंगोजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेच्या शेवटी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठी एकतेचा संदेश दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*