प्रारंभी सराफ गल्ली येथून शाळेपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभयात्रेत प्रमुख पाहुणे आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी आणि आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते चिंतामणराव पटवर्धन यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शाळेतील शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्रीनिवास ठाणेदार यांनी आपल्या जडण घडणीत चिंतामणराव हायस्कुलचा मोठा वाटा असल्याचे सांगून शाळेतील शिक्षकांनी केलेले संस्कार मोलाचे आहेत असे आपल्या भाषणात नमूद केले.महापौर मंगेश पवार आणि खासदार जगदीश शेट्टर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
https://youtube.com/shorts/XiFWkqk0Zas?si=11Yy42epvcB9uEvJ
यावेळी राजलक्ष्मी राजे पटवर्धन यांनी दहावीच्या परीक्षेत विज्ञान आणि इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रु. रोख रक्कम बक्षीस म्हणून दरवर्षी देण्याचे जाहीर केले.शताब्दी महोत्सवाला परदेशातून तसेच विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी आले होते.
Also read









