LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कंग्राळी खुर्दमध्ये मसणाई व मातंगी देवीची वार्षिक यात्रा*

कंग्राळी खुर्द : गावाचे ग्रामदैवत मसणाई देवी व मातंगी देवी यांची वार्षिक यात्रा यंदा मंगळवारी (९ डिसेंबर) आणि बुधवारी (१० डिसेंबर) मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाणार आहे. गावडे कमिटी, ग्रामपंचायत तसेच हक्कदार घराण्याकडून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून घराघरांमध्ये स्वच्छता, सजावट आणि स्वागताची तयारी सुरू आहे. मंगळवारी दुपारी ११ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात हक्कदार घराण्याकडून देवीचा मुखवटा यात्रास्थळी आणला जाणार आहे. त्यानंतर पुजारी व सुहासिनींच्या हस्ते विधीवत पूजन करून मसणाई देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल.

सायंकाळी नैवेद्यानंतर पहिला गाऱ्हाणा आयोजित करण्यात येणार असून रात्री उशिरापर्यंत भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे. ओटी पूर्ण झाल्यानंतर इतर सुहासिनी ओटी भरण्याचा विधी करू शकतील.

बुधवारी सकाळी ९ वाजता दुसरा गाऱ्हाणा तसेच एकत्रित गाऱ्हाणा पार पडेल. त्यानंतर इंगळा कार्यक्रमाचे आयोजन आहे. दिवसभर सुहासिनींना ओटी भरणे व दर्शन यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त गावात खेळणी, प्रसाद, ओटीचे साहित्य, खाद्यपदार्थ, पाळणे यांसह विविध स्टॉल्स सजू लागले आहेत. अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस अधिकारी व स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. यात्रेदरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि पारंपरिक उत्साह राखण्यासाठी समितीने सर्व भाविकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*