LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*महिला सक्षमीकरण आणि वाचन संस्कृतीवर अण्णासाहेब बंगारी यांचे प्रेरणादायी विचार*

 

बेळगाव/ बंगळूर : (विशेष प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण, वाचन संस्कृती आणि मानवतावादी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजाला प्रेरणादायी संदेश दिला. एका कार्यक्रमात आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. महिला सक्षमीकरण ही केवळ गरज नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून, त्यांनी आत्मनिर्भर बनून देशाच्या आर्थिक प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. बालपणातील संस्कार हे येणाऱ्या पिढीच्या घडणीत अत्यंत महत्त्वाचे असतात, असे सांगत त्यांनी आई-वडील, गुरुजन, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर्श घेऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली. वाचन संस्कृती जपण्यावर विशेष भर देताना त्यांनी गावागावांत वाचनालयांची उभारणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. “दिवसेंदिवस वाचनाची सवय वाढवली तरच समाज विचारांनी समृद्ध होईल,” असे त्यांनी नमूद केले. असे प्रतिपादन समाजसेवक व उद्योजक अण्णासाहेब बंगारी यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आशाकिरण कामगार संघटना आणि महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा भारती एम. ढवळी होत्या.

आशाकिरण कामगार संघटना बेळगांव , महिला कल्याण संस्था वडगाव बेळगाव, विश्वभारात जनकल्याण सामाजिक संस्था बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव, रत्नार्जुन फाउंडेशन पुणे, जे. के फाउंडेशन बेळगाव दीपज्योती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.

प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर मंडळी आणि प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक व उद्योजक अण्णासाहेब बंगारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीसी बँक चे डायरेक्टर बाळेश निंगाप्पा दासणाटी, समाजसेविका राजश्री प्रकाश नायक , माजी नगरसेवक अनिल पाटील, समाजसेवक कवी प्रा निलेश शिंदे, लेबर सेल डिपार्टमेंट बेंगलोरचे सदस्य समीर बाळेकुंद्री, माजी ग्रामपंचायत सदस्य निंगगौडा निंगाप्पा हालन्नावर, श्रीधर पाटील, भाग्यश्री पाटील, विनोद नायक, महेश सदलगे, रेश्मा होंगल, चंदना खामकर, एस. एस. पाटील, मारुती बेडीगेर, एन. एस. हवालदार, अमोल सुतार, प्रा. एन जी. पाटील, डॉ. गजानन वरपे, बाळू कुरबर, प्रा. मयूर नागेनहट्टी, यल्लाप्पा पाटील, विशाल पाटील, सागर गुंजीकर, सुधीर लोहार, प्रा. शशिकांत धामणेकर व्यासपीठावरती उपस्थित होते.

नूतन नवनिर्वाचित डीसीसी बँकेचे नामनिर्देशक संचालक बाळेश दासनटी त्यांचा विशेष साल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्वागत रोहिणी होंगल यांनी केले. प्रास्ताविक भाग्यश्री धनुगोळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रमेश्री लक्कनावर यांनी करून दिला. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, राजश्री नायक यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन सुमा भास्करी यांनी केले. आभार पुष्पवती के यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी महिला , विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अण्णासाहेब बंगारी पुढे म्हणाले; आधुनिक काळात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धेला थारा नसावा, असे स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून, मानवतावाद आणि माणुसकी जपणारे कार्यच समाजाला पुढे नेईल, असे त्यांनी सांगितले. आज जगभरात वाढत्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी युवकांना आणि महिलांना प्रेरित केले. न्यूनगंड न बाळगता प्रत्येकाने आत्मविश्वासाने पुढे जावे आणि स्वतःमध्ये विविध कौशल्यांचा विकास करावा, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*