Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठा समाजाचा बेळगावात आनंदोत्सव जरांगे यांच्या आंदोलनाला यश*

मराठा समाजाचा बेळगावात आनंदोत्सव
जरांगे यांच्या आंदोलनाला यश
बेळगाव:
मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व असलेल्या मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला २ सप्टेंबर रोजी यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे. त्यामुळे बुधवारी बेळगाव मधील धर्मवीर संभाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांकडून धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, मराठा समाजाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा समाज बेळगावचे नेते आणि माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे, रमाकांतदादा कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांचे बेळगाव मधील सकल मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, मोहन कांबळे यांच्यासह अन्य दलित बांधव उपस्थित होते.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*