LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*‘स्त्रीध्वनी’ उपक्रमातून महिलांचा सन्मान; KLE रेडिओची पुढाकार*

बेळगाव : KLE Societyच्या वेणुध्वनी 90.4 FM या सामुदायिक रेडिओ केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार (दि. 30 मार्च 2026) रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त Janaki K. M. उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात वेणुध्वनी रेडिओद्वारे ‘स्त्रीध्वनी’सारख्या उपक्रमातून विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची ओळख समाजापर्यंत पोहोचवली जात असल्याचे सांगून या प्रयत्नांचे कौतुक केले.

समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर आदर आणि समज आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांना प्रोत्साहन देणारी भूमिका पुरुषांनी स्वीकारल्यास त्यातून अधिक सक्षम आणि समतोल समाजाची निर्मिती होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात Dr. Sucheta Kurundkar यांनीही विचार मांडले. आजच्या वेगवान युगात केवळ आर्थिक यश नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आणि मानवी मूल्येही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. “Learn, Earn and Return” या तत्त्वाचा अवलंब केल्यास जीवन अधिक समृद्ध आणि संतुलित होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Dr. V. M. Pattanashhetti होते. त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून त्यांच्या योगदानामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात वेणुध्वनी बानुली केंद्राचे निलय व्यवस्थापक Dr. Vireshkumar Nandagav यांनी केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थित महिलांनी आपले अनुभव व मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजीनाथ पाई आणि अनुपमा के. यांनी केले. कार्यक्रमाला मंजीनाथ बल्लारी, मनीषा पी. एस. तसेच केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*