LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारी ‘सक्षम’ सायक्लोथॉन*

ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारी ‘सक्षम’ सायक्लोथॉन; बेळगावात इंडियन ऑइलकडून जनजागृती उपक्रम

बेळगाव | प्रतिनिधी

देशभरात ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी सक्षम (Sanrakshan Kshamata Mahotsav) हा विशेष उपक्रम राबवला जातो. याच उपक्रमांतर्गत यंदा १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सक्षम पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, बेळगाव विभागीय कार्यालयाच्या वतीने रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा बचत आणि इंधन संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या सायक्लोथॉनमध्ये सुमारे ७० ते ८० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचा शुभारंभ इंडियन ऑइलचे वरिष्ठ व्यवस्थापक (रिटेल सेल्स) श्री. सतीश यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. सायक्लोथॉनदरम्यान सहभागी नागरिकांनी इंधन बचत, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरण संरक्षणासंबंधी विविध घोषवाक्ये फलकांद्वारे प्रदर्शित केली. संपूर्ण मार्गावर ऊर्जा संवर्धनाचा प्रभावी संदेश देत घोषणाबाजी करण्यात आली.

ऊर्जेचा विवेकपूर्ण वापर करणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो, असे मत यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सक्षम मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मोलाचे ठरत असल्याचेही सांगण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी