LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मुत्यानट्टीला 24x7 पाणीपुरवठ्याचे अमृत: 5 लाख लीटर क्षमतेची टाकी सुरू*

बेळगाव | दीर्घकाळ पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुत्यानट्टी गावातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या हस्ते गावातील ५ लाख लीटर क्षमतेच्या नव्या पाण्याच्या टाकी आणि २४ तास जलपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पामुळे मुत्यानट्टीसह परिसरातील पाणीपुरवठ्याचा जुना प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना मंत्री भैरती सुरेश यांनी उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ यांच्या विकास उपक्रमांचे कौतुक केले. बेळगावच्या पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार व्यवस्था उभारणीसाठी त्यांच्या विभागाकडून तब्बल १००० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.

ही महत्वाकांक्षी योजना KUIDFC, महानगरपालिका बेळगाव आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने KUWSMP मार्फत राबविण्यात आली आहे. महापौर मंगेश पवार, आमदार आसिफ सेठ, उपमहापौर वाणी जोशी, आयुक्त कार्तिक एम., तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे लोकार्पण झाले.

आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, अनेक वर्षे मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. मंत्र्यांनी मंजूर केलेल्या ५ कोटींच्या विशेष अनुदानातून आणखी एक पाणीपुरवठा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

गावातील नागरिकांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले,
“पूर्वी पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. आता ५ लाख लीटर क्षमतेची टाकी आणि २४ तास पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे आमची जुनी चिंता संपली आहे.”

कार्यक्रमास महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*