LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*ड्रग्जमुक्त समाजासाठी सर्वांनी एकत्र यावे : सतीश जारकीहोळी*

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पोलिस विभागाच्या वतीने बेळगावातील संगोळी रायण्णा महाविद्यालयात ‘बेड ब्रो’ व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त आणि सुसंस्कारांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यावरच नव्हे, तर शिक्षण, कुटुंब आणि संपूर्ण समाजावर गंभीर परिणाम करणारे आहे. क्षणिक आकर्षणाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी नमूद केले.

ड्रग्जमुक्त समाज घडविण्यासाठी पोलिस विभाग, शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युवक हे देशाचे मौल्यवान सामर्थ्य असून त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा दिल्यास सक्षम, निरोगी आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये जोपासावीत, अमली पदार्थांसारख्या घातक सवयींपासून दूर राहून आदर्श नागरिक म्हणून समाजासमोर उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. त्यागराज, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*