बेळगाव बार असोसिएशनच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल ॲड. सचिन रामप्पा शिवण्णावर यांचा मल्लिकार्जुन नगर रहिवासी संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात महांतेश तोरणगट्टी, वसणगौडा पाटील, शिवानंद लाळसंगी, दुंडप्पा संकेश्वर, वीरेंद्र गोबरी, शिवानंद चव्हलागी, महेश दलवाई, प्रकाश देसाई, श्रीशैल नंदीहळ्ळी, इराण्णा उल्लागड्डी, रामप्पा शिवण्णावर तसेच महेश शिवण्णावर आदी उपस्थित होते.
सत्कारावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. सचिन शिवण्णावर यांच्या सामाजिक बांधिलकीसह कायदे क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. बार असोसिएशनमध्ये त्यांनी प्रभावी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

