Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*खड्डे, बॅरिकेड्स आणि पथदिव्यांवर अभय पाटील यांचा अधिकाऱ्यांना ‘अॅक्शन प्लॅन’*

बेळगाव : उद्यमबाग परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आमदार अभय पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करत त्यांनी खड्डे, बॅरिकेड्स, पथदिवे आणि वाहतुकीच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

परोहित यांच्या समोरील प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले बॅरिकेड्स हटवून दुहेरी रस्त्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दुहेरी रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देशही देण्यात आले. विशेषतः प्रवेशद्वाराजवळील खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती प्राधान्याने करण्यास सांगण्यात आले.

खानापूर रोडवरून फाउंड्री क्लस्टरमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरता रॅम्प तयार करण्याची सूचनाही करण्यात आली. तसेच चेंबर ऑफ कॉमर्सजवळील बॅरिकेड्स हटवून वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध करून देता येईल का, याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दरम्यान, दुहेरी रस्ता तसेच सेलिब्रेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्याचे आदेश आमदार अभय पाटील यांनी दिले.

उद्यमबाग परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच नागरिकांची दैनंदिन गैरसोय कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

खड्डे, बॅरिकेड्स, रॅम्प आणि पथदिवे या चारही मुद्द्यांवर तातडीची कार्यवाही करण्याच्या सूचना देत आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर परिसरातील समस्यांचा ‘अॅक्शन प्लॅन’च मांडला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*शिंदोळीत अवैध दारू विक्रीवर मारिहाळ पोलिसांचा छापा; 9,820 रुपयांची दारू जप्त**बेळगाव शहरातून सराईत गुन्हेगाराला हद्दपार; सहा गुन्हे दाखल असलेल्या सुरेश जाळगारवर पोलिसांची कारवाई**उद्यमबाग पोलिसांची मोठी कारवाई; 1.21 किलो गांजासह एकाला अटक**तंजावर येथील १ले सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून सहभागाचे नियोजन**खड्डे, बॅरिकेड्स आणि पथदिव्यांवर अभय पाटील यांचा अधिकाऱ्यांना ‘अॅक्शन प्लॅन’**निवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद**निर्यात व्यवसायासाठी बेळगावमध्ये मोठ्या संधी : स्वप्नील शहा**मोरबात ४९ लिटर कच्ची दारू जप्त; अ‍ॅबकारी विभागाची कारवाई, एकाला अटक**निर्माण-2 पोर्टलवरील अभियंत्यांचे परवाने तातडीने नूतनीकरण करण्याची CREDAI ची मागणी**बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू*