बेळगाव :
उत्तर कर्नाटकातील ग्राहकांसाठी लक्झरी बाथरूम सोल्युशन्सच्या क्षेत्रात एक नवी संधी उपलब्ध होणार आहे. बेळगाव येथील प्रसिद्ध हेडा सिरॅमिक्स लवकरच शहरात ‘आर्टाइझ एक्सपिरीयन्स सेंटर’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. सुमारे 3000 चौ.फूट क्षेत्रफळात उभारण्यात येणारे हे केंद्र उत्तर कर्नाटकातील पहिले विशेष आर्टाइझ सेंटर ठरणार आहे.
हेडा सिरॅमिक्सचे प्रमुख विजयकुमार हेडा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ग्राहकांना आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत डिझाईन, दर्जेदार उत्पादने आणि संपूर्ण बाथरूम सोल्युशन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
2005 पासून जॅक्वार समूहासोबत हेडा सिरॅमिक्सची विश्वासार्ह भागीदारी कायम आहे. या सहकार्यामुळे ग्राहकांना जागतिक दर्जाच्या बाथ फिटिंग्स आणि अत्याधुनिक उत्पादनांचा अनुभव मिळत आहे.
आर्टाइझ हा जॅक्वार समूहाचा लक्झरी बाथ ब्रँड असून कलात्मक डिझाईन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कार्यक्षमता यांचा संगम या उत्पादनांमध्ये पाहायला मिळतो. सॅनिटरीवेअर, प्रीमियम फॉसेट्स, शॉवर्स, वेलनेस उत्पादने आणि संपूर्ण बाथरूम सोल्युशन्स या सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहेत.
‘लाइफस्टाईल रिडिफाइन’ या संकल्पनेवर काम करत हेडा सिरॅमिक्स घरमालक, वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर्स आणि बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना दर्जेदार सेवा देत आहे.
जॅक्वार समूहाने लक्झरी विभागासाठी आर्टाइझ, प्रीमियम श्रेणीसाठी जॅक्वार आणि किफायतशीर पर्यायांसाठी एस्स्को अशा विविध ब्रँड्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.
पत्रकार परिषदेला हेडा सिरॅमिक्सचे विजयकुमार हेडा, शरद हेडा, जॅक्वार समूहाचे दक्षिण विभाग प्रमुख एम. टी. हेगडे, श्रीहरी गणेश, गौरव मल्होत्रा, पुनीत वर्मा यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पत्रकारांना आर्टाइझच्या विविध लक्झरी उत्पादनांची माहिती देण्यात आली.
