LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात*

मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
यावर्षी देशातील अनेक राज्यात महापुरामुळे शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले. अन्न ,वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गरजांपासून माणसे दुरावली गेली. अशा संकटग्रस्त, पूरग्रस्त परिस्थितीतील बांधवांसाठी मदतीचा हात देण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्त मदतनिधीसाठी शाळा ते महात्मा गांधी चौक (आरगन तलाव) पर्यंत संवेदना फेरी काढण्यात आली आणि मदतीचे आवाहन करण्यात आले .

या आवाहनाला विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन पूरग्रस्तांसाठी 1,00,000/ रुपयाचा निधी शाळेमध्ये जमा केला. हा मदतनिधी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी दैनिक सकाळच्या "सकाळ रिलीफ फंडाकडे' मा.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर,उपाध्यक्ष सुरेश पाटील, सदस्य किरण पाटील , मुख्याध्यापक बी .जी. पाटील प्राथमिक विभाग, मुख्याध्यापक एन .सी. उडकेकर माध्यमिक विभाग, माजी विद्यार्थी शुभम अतिवाडकर, संयोजिका नीला आपटे, समन्वयक सविता पवार, पूर्व प्राथमिक प्रमुख गौरी चौगुले ,बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते दैनिक सकाळचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन मुगळी ,उदय होनगेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी दैनिक सकाळचे प्रतिनिधी मल्लीकार्जुन मुगळी यांनी शाळा करत असलेल्या उपक्रम विषयी कौतुक करून पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या भरघोस मदतनिधीविषयी आभार व्यक्त करुन शाळा सुधारणा समिती, विद्यार्थी ,शिक्षकांचे अभिनंदन केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*