Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा*

बेळगाव शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातून भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

या शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सुंदर सादरीकरण चित्ररथांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील प्रमुख मार्गांवर शोभायात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा झेंडे लावण्यात आले होते. महिला व तरुणींनी रस्त्यावर विविध रंगीबेरंगी रांगोळ्या काढून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या रथावर भगवान महावीरांची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली होती. टिळक चौक येथे जैन समाजातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या लहान मुली आणि झाँज पथकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कडक उन्हाचा विचार करून जैन समाजाच्या वतीने मार्गावर ठिकठिकाणी थंड दूध, ताक, सरबत आणि लस्सीचे वितरण करण्यात आले.
महावीर भवन येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*