LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा*

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राज्यातील विविध ठिकाणाहून आलेली कला पथके शोभयात्रेचे आकर्षण ठरली. किल्ल्या जवळील अशोक चौक येथून शोभयात्रेला प्रारंभ झाला. महर्षी वाल्मिकिंची भव्य मूर्ती रथात ठेवण्यात आली होती. महर्षी वाल्मिकिंच्या पुतळ्याचे पूजन महापौर आणि उप महापौर यांच्या हस्ते करण्यात आले. सुहासिनी मंगल कलश घेऊन शोभयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. वराह तसेच अन्य अवताराचे दर्शन घडवणाऱ्या कलाकारांनी शोभयात्रेची शोभा वाढवली.

चित्रं विचित्र मुखवटे आणि वेशभुषा परिधान केलेले कला पथक शोभयात्रेचे आकर्षण ठरले. धनगरी वेशातील धनगरी ढोल पथकाने देखील आपल्या ढोल वादनाने साऱ्यांची मने जिंकली. भल्या मोठ्या आकाराच्या हलगीचे वादन करणाऱ्या कलाकारानी देखील शोभयात्रेच्या मार्गांवर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शोभयात्रेत मोठ्या संख्येने वाल्मिकी समाज बांधव सहभागी झाले होते. शहरातील मार्गांवर फिरून शोभयात्रेची कुमार गंधर्व सभागृह येथे सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*