शिनोळी बु. : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिनोळी बु. येथे देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद परशराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजपूजन उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी केले.
यावेळी ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सूर्यवंशी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काशिनाथ पाटील यांनी महात्मा गांधी, विठ्ठल कृष्णा बोकमूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, नितीन नारायण पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, शामराव चांभार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर पुंडलिक बाळू मेणसे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या रेखा शिवाजी तानगावडे, सुनीता शटुप्पा पाटील, विद्या प्रकाश गावडे, सुप्रिया शाम पाटील, सरिता रघुनाथ जाधव ,डॉ. ऐश्वर्या बाबू पाटील तसेच पोलीस पाटील जत्ती मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, झेंडागीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेला होता.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, तसेच रामकृष्ण सुतार, रघुनाथ गुडेकर, दौलत मेणसे, विनोद पाटील , यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्या ,ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले.
राष्ट्रभक्ती, सामाजिक एकोपा आणि देशसेवेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
