बेळगाव : बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशन (BAMA)च्या वतीने फोर्ट रोड येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, ऑटोमोबाईल डीलर्स आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओम प्रकाश वैष्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. BAMAचे अध्यक्ष शरद पी. पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर संघटनेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत ऑटोमोबाईल व्यवसायासमोरील विविध छोट्या-मोठ्या अडचणी, भविष्यातील व्यवसायाच्या संधी आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
BAMAचे अध्यक्ष शरद पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच विविध प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या सहकार्याची माहिती सदस्यांना दिली.
वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासनाचे आभार
बेळगाव उत्तरचे आमदार राजू सैत, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अध्यक्ष शरद पाटील यांनी कौतुक केले.
व्यवसाय चालविताना BAMAच्या सदस्यांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संघटना त्यांच्या पाठीशी राहील आणि संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.
BAMAच्या वतीने कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारून सहकार्य केल्याबद्दल समर्थ खुडे यांचेही आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाला BAMAचे अध्यक्ष शरद पी. पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर, माजी अध्यक्ष फिरोज खान, माजी सचिव मनजीतसिंग कोहली, वहाब, अमजद, सुहास पाटील, शाम धमुणे, विल्सन, शंभू, गोपाल प्रजापत, विशाल पाटील, संजय मासेकर, अरुण तापसकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
डी मीडिया न्यूज | बेळगाव
