Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*२४ मे रोजी ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन*

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून यंदाचे साहित्य संमेलन विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध होणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्र, संमेलनाध्यक्षांचे भाषण, प्रेरणादायी शिवव्याख्यान तसेच बहारदार काव्यमैफिल अशा तीन प्रमुख सत्रांमध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असून साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

या बैठकीस परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, एम. के. पाटील, रणजीत चौगुले, संजय गुरव, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, मनीषा नाडगौडा, गीता घाडी, सविता व्यसने, रोशनी हुंद्रे, नेत्रा मेणसे, स्मिता किल्लेकर, संजीवनी खंडागळे आणि स्मिता मेंडके उपस्थित होत्या.

Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*हेरॉईन विक्री प्रकरणातील संशयिताला न्यायालयाकडून दिलासा**२४ मे रोजी ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन**७ गंभीर विषयांवर मंत्री, आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत थेट चर्चेचा एफओएबीचा निर्णय**बेळगावात 4,500 कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास वेगात**बेळगावात रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या**बेळगावात गुणवंत विद्यार्थ्यांना ₹25 हजारांची शिष्यवृत्ती; पालकांकडून कौतुक**बेळगावात शिवम असोसिएट्सवर मोठी कारवाई; आर्थिक व्यवहारांची चौकशी तीव्र**पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; महागाईचा पुन्हा भडका**मल्लिकार्जुन नगर रहिवासी संघाकडून ॲड. सचिन शिवण्णावर यांचा गौरव**बेळगावात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात; दरवर्षी उत्सव साजरा करण्याचा निर्णय*